गोदावरीचे खोरे आणि जुन्नर परिसरात ' बागायती बिबळे'!
-विनायक परब
The misunderstood carnivore © Biddappa P A
बिबळ्या आणि माणूस यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत रंगविले जात असतानाच गेल्या वर्षभराहून अधिक काळासाठी बिबळ्याचा माग उपग्रहाच्या माध्यमातून काढल्यानंतर अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. गोदावरीच्या खोऱ्यातील बागायती शेती आणि जुन्नर परिसरातील शेतांमध्ये हा बिबळ्या दिवसभर असतो. त्या संपूर्ण दिवसभरात तो कधीच कुणावर हल्लाही करत नाही किंवा माणसांनाही त्याच्या अस्तित्वाचा थांग नसतो. रात्र झाल्यानंतर मात्र हा 'बागायती बिबळ्या' तो शेतातून बाहेर पडतो आणि शेजारच्या गावांमधील उकिरड्यांवर येणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो आणि आपले पोट भरतो, असे लक्षात आले आहे. सर्वाधिक बिबळे हे वनक्षेत्रात राहतात, हा आजवरचा समजही या उपग्रहांमार्फत केलेल्या अभ्यासामध्ये खोटा ठरला आहे.
बिबळ्या आणि माणूस यांच्यामध्ये संघर्ष असल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांत रंगविण्यात आले आहे. मात्र या 'बागायती बिबळ्यां'नी ते पूर्णपणे खोटे ठरवले आहे. त्यांची मोठी संख्या आणि क्वचित बळी जाणाऱ्या माणसांची संख्या यांचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे.
आपल्याकडील संरक्षित क्षेत्र हे केवळ पाच टक्के तर वनक्षेत्र हे २० टक्के आहे. बिबळे हे प्रामुख्याने वनक्षेत्रातच राहत असावेत आणि बाहेर येऊन मग माणसांवर हल्ले करत असावेत, असा अंदाज होता. मात्र अलीकडेच करण्यात आलेल्या उपग्रह चित्रणामध्ये हा सपशेल खोटा ठरला आहे. डॉ. विद्या अथ्रेया यांनी अलीकडेच या संदर्भात महाराष्ट्रात व्यापक सर्वेक्षण संशोधन उपग्रहाद्वारे केले. यामध्ये बिबळ्यांच्या गळ्याभोवती आरएफआयडी टॅग्ज लावण्यात आले होते आणि त्यानंतर उपग्रहाद्वारे त्यांच्या वावराचे चित्रण करण्यात आले. गोदावरीचे खोरे आणि जुन्नर परिसर या दोन प्रमुख ठिकाणांचा त्यात समावेश होता. त्यावेळेस असे लक्षात आले कि, संपूर्ण दिवसभर या बागायती परिसरात शेतीमध्येच बिबळे असतात. ते ना बाहेर पडत, ना कुणावर हल्ला करत. मात्र रात्रीनंतर त्यांच्या वावरास सुरवात होते. उकिरड्याच्या आसपास असणारे कुत्रे, डुकरे आदी इतर प्राणी त्यांचे लक्ष्य असतात. त्यातही प्रामुख्याने कुत्र्यांवरच ते अधिक पोट भरतात.
या अभ्यासाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. विद्या अथ्रेया म्हणाल्या कि, माणसांवरचे हल्ले हे क्वचित होतात. त्यातही अनेकदा ते अपघाताने झालेले असतात. म्हणजे माणसाची हत्या करणे हा त्यांचा उद्देश नसतो पण तो त्याला डिवचतो किंवा मग त्यांच्या मार्गात मध्येच येतो आणि त्यानंतर तो माणसाला घाबरवण्यासाठी पंजा मारतो. माणसाला ठारच करायचे असेल तर त्याला त्यासाठी अवघे मिनिटभर पुरेसे ठरू शकते. पण तो तसे करता नाही, कारण तो त्याचा उद्देशच नसतो. या अभ्यासावरून असेही लक्षात आले आहे कि, गावांमधील उकिरडे स्वच्छ ठेवले, तर कदाचित तिथे कुत्रे आदी प्राणी पोसले जाणार नाहीत. आणि मग पर्यायाने बिबळे त्यांच्या या मानवी अधिवासाच्या सवयी बदलतील अशी शक्यता आहे. मग त्यांना भक्ष्यासाठी केवळ जंगलावरच अवलंबून राहावे लागेल, डॉ. अथ्रेया म्हणाल्या.
मुंबईमध्येही होणार उपग्रहाद्वारे अभ्यास
येत्या ऑगस्ट महिन्यापासून मुंबई परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असलेल्या बिबळ्यांचाही अशाचप्रकारे आरएफआयडी टॅग्जच्या माध्यमातून उपग्रहाद्वारे अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उदयनाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. त्यासाठी डॉ. विद्या अथ्रेया यांच्याबरोबर वन्यजीव क्षेत्रात कार्यरत तज्ञ्, विद्यार्थी आणि संशोधक यांची मदत घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुमारे वर्षभर चालेल. यात बिबळ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा अभ्यास करण्यात येईल. त्यांची माहिती उपग्रहाद्वारे घेऊन त्यांची विष्टा गोळा करण्यात येईल, त्यातून अनेक गोष्टी उलगडत जातील, असेही लिमये म्हणले.
This article was originally published in Loksatta, Marathi
English Translation:
Against the backdrop of media reports talking of incessant increase in human-leopard conflict during the last few years, a year-long satellite study undertaken a few years ago had shed light on some surprising facts. The study showed that leopards stayed in the farmlands of Akole landscape in the Godavari basin throughout the day. They neither attacked anyone nor did humans have any idea of its presence during this time. It was observed that it is only when the night falls the leopards come out of their hiding place and prey on animals gorging at the garbage dump in surrounding villages. These findings, based on radio collaring of the leopards, have also busted a popular belief that most of the leopards live in forested areas.
The high number of leopards in the landscape is directly disproportionate with the very few attacks happened on humans here. Thus, the picture painted of high incidence of human-leopard conflict is not realistic.
Dr. Vidya Athreya from WCS – India has conducted an extensive study in this regard in Maharashtra. In this study, GPS collars were placed around the neck of leopards and their movements monitored using satellite tracking. The Ahmednagar district was the main study area.
Offering more insights into the study, Dr. Vidya Athreya says that attacks on humans are rare and most often happen by accident. When provoked, a leopard tries to defend itself from a human and intimidates him with its paw. If it really wants to kill, all it would take is a minute. The study also makes it clear that if the garbage dumps are removed from the villages, the number of animals like dogs and pigs would drop, resulting in leopards looking elsewhere and not near human habitations.